ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

धारावीतील १०×१० च्या घरातून मानवतेची मोठी सेवा; टाटा मेमोरियल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसाठी सौ. सविता होलमुखे यांचे १३ वर्षांपासून दररोज २५० जणांना विनामूल्य अन्नदान

मुंबई : धारावी येथील एका साध्या १० बाय १० च्या घरातून मानवतेची मोठी सेवा घडताना दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सौ.सविता अनिल होळमुखे गेल्या १३ वर्षांपासून टाटा मेमोरियल रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दररोज विनामूल्य अन्नदान करत आहेत.
दररोज सुमारे २५० जणांसाठी त्या डाळ, भात, भाजी आणि चपाती असे साधे पण पौष्टिक जेवण स्वतः बनवतात. कोणतेही मानधन न घेता पूर्णपणे सेवाभावाने सुरू केलेला हा उपक्रम आज अनेक गरजूंसाठी मोठा आधार ठरत आहे.
या कार्यासाठी ‘अन्नदाता सुखी भव’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली असून सविता होलमुखे या संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सुपुत्र जय अनिल होळमुखे अध्यक्ष म्हणून तर जोशना आनंद लोखंडे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त नेरुळ सेक्टर ४८ येथील गणेश मैदान येथे सविता होलमुखे यांना “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमास त्या उपस्थित राहू शकल्या नसल्याने हा सन्मान त्यांच्या मुलगा जय होलमुखे यांनी स्वीकारला. समाजासाठी निस्वार्थ भावनेने केलेले त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Scroll to Top