ताज्या बातम्या

दोन तरुणांचा मलम्यात गुदमरून दुर्दैवी मृत्यू पाईपलाईनसाठी काढलेल्या चरीत काम करताना मलमा कोसळून दुर्दैवी घटना; मनव परिसरात शोककळा

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : उंडाळे (ता कराड) येथे संगम ठाकराची मळी नावाच्या शिवारात नदीतील पाणी विहिरीत सोडण्यासाठी काढलेल्या चरित सिमेंटच्या पाईप टाकण्यासाठी खुदाई करुन त्या जोडण्यासाठी चरित उतरलेल्या दोघा मजुरांच्या अंगावर मलमा पडून गुदमरून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. किरण बाजीराव चव्हाण (वय ३०) व अमर रंगराव वडार (वय ३०) दोघेही रा. मनव अशी मृत झालेल्याची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळ वरून मिळालेली माहिती अशी की उंडाळे मनव रस्त्यावरती ठाकराची मळी नावाच्या शिवारात पुलाशेजारी श्रीरंग हरी पाटील यांच्या शेताजवळ असणाऱ्या

ओढ्यावरील विहिरीत पाणी सोडण्यासाठी आज सकाळपासून जेसीबीच्या साह्याने दहा ते बारा फूट

चर काढण्याचे काम सुरू होते. ही चर काढून झाल्यानंतर त्यामध्ये सिमेंटच्या पाईप टाकण्यासाठी मनव येथील किरण चव्हाण (वय २९) व अमर उर्फ (सोन्या) वडार वय ३० यांना सिमेंटची पाईप लाईन जोडण्यासाठी सांगण्यात आले होते.

चर काढून झाल्यानंतर जेसीबी ऑपरेटर व त्याच्यासोबतअसणारे इतर मंडळी बाजूला झाडाच्या सावलीला जेवण्यासाठी गेले होते. यावेळी किरण आणि अमर यांनाही जेवण झाल्यानंतर थोडावेळ थांबून पाईप टाकूया असे सांगण्यात आले होते. मात्र किरण व अमर यांना इतर दुसऱ्या ठिकाणी काम असल्यामुळे लवकर जायचं असल्त्यायामुळे त्यांनी कोणालाही न सांगता काढलेल्या चरीमध्ये सिमेंटच्या पाईप जोडण्यासाठी उतरले असता. त्याच वेळी काम सुरू असताना चरीमध्ये काम करणाऱ्या दोघांचे अंगावर

अचानक मातीचा ढिगारा कोसळला व दोघेही यादी घराच्या खाली अडकले त्यामध्ये त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला.

बाजूलाच जेवण्यासाठी गेलेल्या जेसीबी ऑपरेटर यांना हे दोघे दिसेना झाल्यानंतर त्यांनी काढलेल्या चरित पाहिले असता चरीमध्ये मलमा पडल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी कोणताही विलंब न करता मदत कार्य सुरू केले परंतु तब्बल वीस मिनिटांचे अत्यंत सावधपणे केलेल्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले परंतु

तोपर्यंत दोघेही जागेवरच मृत्यू दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला होता मात्र बराच वेळ झाल्यामुळे अंगावरती मलमा पडल्यामुळे दोघांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला होता.

दोघांना चरीतून बाहेर काढून तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांनाही मृत असल्याचे घोषित केले.

घटनेचे वृत्त कळतच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्याची मोठी गर्दी झाली. या घटनेची फिर्याद कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये मध्ये नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

घटनास्थळी काम सुरू असताना या विहिरीचे मालक संदीप पाटील व गावातील अन्य एक व्यक्ती पाईपलाईनची पाईप धरण्यासाठी या कामगारांना चरीत उतरले होते परंतु सुदैवाने यापैकी एक जण काहीतरी कामानिमित्त चरीच्या बाहेर आला व मालक संदीप पाटील हे बाजूला पाईप धरून त्यांना मदत करत असताना वरून ढिगारा कोसळला. त्यात संदीप पाटील यांच्या ही अंगावर काही माती माती पडली पण ते बचावले व बाहेर पडले परंतु दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून संदीप पाटील व अन्य व्यक्ती या अपघातातून बचावली.

Scroll to Top