मुंबई(भीमराव धुळप) : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागून होते. अखेर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
महापालिकांतील सत्तास्थापनेसाठी ही आरक्षण सोडत अत्यंत निर्णायक ठरणार असून, ज्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे, त्याच प्रवर्गातील व्यक्तीला महापौरपदाची संधी मिळणार आहे. यंदा महिलांना मोठे प्रतिनिधित्व मिळाले असून २९ पैकी तब्बल १५ महानगरपालिकांमध्ये महापौरपद महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
२९ महानगरपालिकांसाठी महापौरपद आरक्षण पुढीलप्रमाणे :
मुंबई – खुला प्रवर्ग (महिला),ठाणे – अनुसूचित जाती
नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला), कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती, भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग, उल्हासनगर – ओबीसी, मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग (महिला), वसई-विरार – खुला प्रवर्ग, पुणे – खुला प्रवर्ग (महिला), पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग, कोल्हापूर – ओबीसी, इचलकरंजी – ओबीसी, सांगली-मिरज-कुपवाड – खुला प्रवर्ग, सोलापूर – खुला प्रवर्ग, छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग, लातूर – अनुसूचित जाती (महिला), जालना – अनुसूचित जाती (महिला), पनवेल – ओबीसी, अकोला – ओबीसी (महिला), अहिल्यानगर – ओबीसी (महिला), चंद्रपूर – ओबीसी (महिला), जळगाव – ओबीसी (महिला), अमरावती – खुला प्रवर्ग, धुळे – खुला प्रवर्ग (महिला), नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला), नागपूर – खुला प्रवर्ग (महिला), नाशिक – खुला प्रवर्ग (महिला), परभणी – खुला प्रवर्ग, मालेगाव – खुला प्रवर्ग (महिला)
या आरक्षण सोडतीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे केंद्रित झाले असून, आगामी सत्तास्थापनेचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.




