पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पनवेल शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधून श्री. संजय बबनराव ननावरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्री. ननावरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभागाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
व्यवसायिक क्षेत्रातही ते सक्रिय असून अक्षय फुटवेअर (होलसेल ट्रेडर्स)चे ते प्रोप्रायटर आहेत. तसेच नविन पनवेल येथील व्यावसायिक सहकारी विक्रेता संघ (रजि.)चे खजिनदार आणि गणेश मंदिर ट्रस्ट (रजि.), नविन पनवेलचे ट्रस्टी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासत पक्षाचे एकनिष्ठ कार्य, समाजातील गरीब व गरजू घटकांना मदतीचा हात देणे, तसेच कोरोना काळात नागरिकांना दिलेली मदत यामुळे श्री. ननावरे यांना जनतेमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख मिळाली आहे. विविध पदांवर काम करताना प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या आशीर्वादाने वॉर्ड १७ मधून उमेदवारी मिळाल्याने, जनतेचा आशीर्वाद घेऊन ही निवडणूक निश्चितपणे जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे वॉर्ड १७ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




