ताज्या बातम्या

न्यूईरा हॉस्पिटल्समध्ये प्रगत दंत उपचार विभागास सुरुवात; सर्व मौखिक समस्यांवर एकाच छताखाली मिळणार उपचार

नवी मुंबई : रुग्णसेवेला अधिक व्यापक व दर्जेदार स्वरूप देण्याच्या दिशेने न्यूईरा हॉस्पिटल्सने आपल्या रुग्णालयात प्रगत दंत उपचार विभाग सुरू केला आहे. या नव्या विभागामार्फत ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरीसह संपूर्ण दंत उपचार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.हा नवीन विभाग आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत उपकरणे आणि अनुभवी तज्ञांच्या टीम एकत्र आणत सर्वसमावेशक दंत सेवा प्रदान करते. नियमित दंत तपासणीपासून ते गंभीर मौखिक आणि मॅक्सिलोफेशियल( जबडा) शस्त्रक्रिया पुरवते ज्यामुळे नवी मुंबईरचकरांना आता अत्याधुनिक दंतसेवेचा लाभ घेता येणार आहे.

*श्री शशिकांत चांदेकर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते या अत्याधुनिक विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. विनोद विज(वरिष्ठ प्लास्टिक सर्जन) आणि डॉ. कोपल विज(ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन) यांची प्रमुख उपस्थिती होती.*

नव्याने सुरू झालेल्या या विभागात प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा, कॉस्मेटिक दंतचिकित्सा, रूट कॅनल उपचार, डेंटल इम्प्लांट्स, मौखिक शस्त्रक्रिया आणि गुंतागुतीच्या जबड्यासंबंधीत समस्यांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. निदानाकरिता प्रगत उपकरणं, आधुनिक डेंटल चेअर्स, सर्व वयोगटातील रुग्णांसाठी उच्च दर्जाची रुग्णसेवा आणि उपचार प्रदान करते.

सर्वच वयोगटांमध्ये दातांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. दात किडणे, हिरड्यांचे आजार, वाकडे दात, जबड्याचे दुखणे, तोंडाता संसर्ग, अडकलेली अक्कलदाढ आणि चेहऱ्याला झालेली इजा यांसारख्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्षित केले जाते. मौखिक स्वच्छतेचा अभाव, जीवनशैलीतील बदल, तणाव, तंबाखूचे सेवन आणि निदानास विलंब यामुळे ओरल आणि मॅक्सिलोफेशियल समस्यांमध्ये वाढ झाली आहे. वेळीच उपचार न घेतल्या या समस्यांमुळे तीव्र वेदना, खाण्यापिण्यात आणि बोलण्यात अडचण, चेहऱ्यासंबंधी विकृती आणि गंभीर संसर्ग होऊ शकतो, जे संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात. ही वाढती गरज लक्षात घेता, न्युईरा हॉस्पिटल्सने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी एक समर्पित दंत विभाग सुरू केला आहे, जो विविध प्रकारच्या दंत, मौखिक आणि मॅक्सिलोफेशियल समस्यांचे वेळीच निदान आणि उपचार करण्यास सुसज्ज आहे. मौखिक आरोग्य हे आपल्या संपुर्ण आरोग्याशी थेट जोडलेले आहे, तरीही वेदना असह्य होईपर्यंत त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या नवीन दंत विभागाद्वारे, आम्ही वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा आमचा ध्यास आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक उपचार प्रदान करणे आमचे उद्दिष्ट आहे आणि रुग्णांना त्यांच्या संपूर्ण दंतोपचार प्रवासात कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची काळजी याठिकाणी घेतली जाईल *अशी प्रतिक्रिया डॉ. कोपल विज (एम.डी.एस., ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन) यांनी व्यक्त केली.*

*डॉ. सुनील कुट्टी (संचालक, न्यूरोसर्जन- मेंदु व मणका, न्युईरा हॉस्पिटल) सांगातात की,* न्यूईरा हॉस्पिटल्समध्ये दंत आणि मौखिक आरोग्यासंबंधीत समस्या व शस्त्रक्रिया, गुंतागुंतीची प्रकरणे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना आता वेगवेगळ्या उपचारांसाठी वेगवेगळ्या केंद्रांना भेट देण्याची गरज लागणार नाही. कारण न्यूईरा हॉस्पिटल्समध्ये आता एकाच छताखाली सर्व उपचार ते ही परवडणारी दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

प्रगत दंतसेवा विभागातंर्गत न्यूईरा हॉस्पिटल्सने दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे ध्येय हाती घेतले आहे. या नव्याने सुरु करण्यात आलेल्या विभागामुळे नवी मुंबईकरांना एकाच ठिकाणी आधुनिक दंत आणि मौखिक आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार *असल्याची माहिती डॉ. माताप्रसाद बी गुप्ता(उपाध्यक्ष आणि सीईओ – न्यूईरा हॉस्पिटल) यांनी दिली .*

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top