ताज्या बातम्या

लोकशाहीच्या चारी खांबांनी दुर्लक्ष केल्यामुळे अन्यायग्रस्तांनी साताऱ्यात घेतला झेंड्याच्या खांबाचा आधार…

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय व लोकप्रतिनिधींच्या जागरूकतेने अनेकांना न्याय मिळत आहे. मिळवून दिला जात आहे. ही एक बाजू असली तरी दुसऱ्या बाजूला अनेकांना आंदोलन करून सुद्धा न्याय मिळत नाही. साताऱ्यामध्ये सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय सन्मान असलेल्या ध्वजाच्या खांबावर चढून एका तरुणाने तासभर बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. लोकशाहीच्या खांबांमुळे दुर्लक्ष होत असल्याच्या भूमिकेतूनच त्याने साताऱ्यात झेंड्याच्या खांबाचा आधार घेतल्याची चर्चा बघ्यांकडून सुरू झालेले आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय प्रतीक असलेल्या ध्वज उभारणीसाठी बारीक शिडी असलेला लोखंडी खांब उभारण्यात आलेला आहे. या खांबावर सासपडे येथील भरत यादव नावाच्या तरुणाने घरगुती कारण व इतर कारणांमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यासाठी शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर नव्हे तर झेंड्याच्या खांबावर उभे राहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे जिल्हा प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये ही खळबळ माजली. अनेकांनी विनंती केल्या सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावली. आपत्ती व्यवस्थापन समितीचे देविदास ताम्हाणे ,उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसोबतच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या अनेकांनी त्याला मानवता भावनेतून खांबावरून खाली उतरण्यासाठी विनंती केली. परंतु त्याने त्याकडे काही काळासाठी दुर्लक्ष केले. पोलीस यंत्रणेने संयम राखून त्याला खाली उतरवण्यासाठी प्रतीक्षा केली. दुपारी सव्वा बारा वाजता त्याचा खांबावरील हात अवघडला व अश्रू अनावर झाल्यामुळे त्याने आपली व्यथा मांडली व खाली उतरण्याचा निर्णय घेतला. या वेळेला त्याला न्याय मिळालाच पाहिजे. असा जयघोष करण्यात आला. या प्रसंगानंतर साताऱ्यातील एका युट्युब चॅनेल च्या पत्रकारांनी अन्यायग्रस्त तोरणाकडे धाव घेऊन त्याचं म्हणणं ऐकण्यासाठी मोबाईल पुढे धरला. परंतु , जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी श्री पाटील यांनी त्या यूट्यूब चॅनलच्या पत्रकार हुसकावून लावले लावले. त्यानंतर गर्दी बाजूला झाली. उपजिल्हाधिकारी श्री पाटील यांनी मायेने त्या अन्यायग्रस्त तरुणाच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपल्या दालनात घेऊन गेले. परंतु पुढे काय झाले ?हे कुणालाच समजू शकले नाही. त्याबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. एखाद्या वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत मत प्रदर्शित करणारे अनेक जण असतात पण वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तातडीने माहिती देण्याचे मात्र टाळले जात आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top