मुंबई : घावरी ग्राम सेवा संघ मुंबई यांच्यावतीने आज मुंबईतील गोरेगाव येथील कोयना भवन येथे “घावरी ग्राम सेवा संघ मुंबई” या सहाव्या दिनदर्शिका प्रकाशन व लोकार्पण सोहळा २०२६चा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संजय दगडू जाधव (चिखली) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शांताराम बाबुराव कदम (सोनाट) — कोयना सोळशी कांदाटी प्रतिष्ठान कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, सुरेंद्र जाधव, संतोष जाधव, नारायण रामचंद्र सकपाळ, रमेश गणपत सकपाळ (शाखाप्रमुख–५१, गोरेगाव) आदी मान्यवर उपस्थित होते.
संघाच्या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश किसन सकपाळ, माजी अध्यक्ष महादेव तुकाराम सकपाळ, तसेच बबन कोंडीबा सकपाळ, किसन शांताराम जाधव, बबन तुकाराम जाधव, चंद्रकांत धोंडू कदम हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास बहुसंख्य कार्यकर्ते, सभासद, ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांनी घावरी ग्राम सेवा संघ मुंबईच्या या दिनदर्शिका प्रकाशन उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी घावरी गावाकडून सातत्याने केले जाणारे प्रयत्न प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येणे हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही काढण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण भगवान सकपाळ यांनी केले. तर संघाचे प्रमुख मार्गदर्शक सल्लागार तानाजी लक्ष्मण सकपाळ यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.




