ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर(प.)तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन

मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना नेते,खासदार व ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ईशान्य मुंबई विभाग प्रमुख श्री.सुरेशजी पाटील यांच्या सहकार्याने आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव मा.श्री.निखिलजी सावंत व ग्रा.कक्ष सचिव अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर (पश्चिम) येथे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चा करण्यात आली.यावेळी घाटकोपर (पश्चिम) येथील साई सद्गुरू भारत गॅस एजन्सी (मंजिरी कंपनी)चे मॅनेजमेंट श्री.हसन बाबुशेठ,असल्फा येथील भारत गॅस कंपनी चे मॅनेजमेंट श्री. सुमित सिंग, तसेच झिग्मा गॅस सर्व्हिस 90 फीट रोड घाटकोपर पश्चिम गॅस सेवा चे मालक श्री.सलीम पटेल व सीनियर मॅनेजमेंट सौ.सुजाता पुजारी यांची भेट घेण्यात आली.सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने निवेदन पत्रक संबंधित व्यवस्थापनाला देण्यात आले.यावेळी शिवसेना घाटकोपर पश्चिम कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,कक्ष कार्यालय प्रमुख श्री. विश्वनाथ जाधव,कक्ष वार्ड संघटक १२३ श्री.संतोष चादे,कक्ष प्रतिनिधी प्रमोद जाधव आदी मान्यवर निवेदन पत्रक देताना उपस्थित होते.

Scroll to Top