ताज्या बातम्या

“ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतिकारी पर्व” ग्रंथाचे दिमाखदार प्रकाशन

मुंबई : “ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतिकारी पर्व” या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन माजी न्यायमुर्ती व राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत असलेल्या या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या ग्रंथाचे लेखकद्वय ज्येष्ठ पत्रकार सुनिल खोब्रागडे व प्रा. श्रावण देवरे यांनी ओबीसी आणि मराठा समाजातील ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय संघर्षाचे सखोल विश्लेषण या पुस्तकातून मांडले आहे.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ एड. अरविंद निरगुडे, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष मान. प्रदिप ढोबळे, ओबीसी अभ्यासक डॉ. लता प्र. म. तसेच ओबीसी नेते राजाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओबीसी नेते धोंडू मानकर, डॉ. नारायण काळेल, युवा नेते दत्ता विसाळे, ओबीसी नेते डी. पी. महाले व एड. कैलास सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी ओबीसी चळवळीतील योगदानाबद्दल ओबीसी योद्धे भरत निचिते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा प्रकाशन सोहळा ओबीसी चळवळीच्या वैचारिक वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top