धारावी(संतोष लिंबोरे) : धारावीतील खांबदेव नगर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. शिवाजी महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री दामोदर खोपडे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा या धार्मिक उपक्रमाचे ५५ वे वर्ष पूर्ण होत आहे.
सप्ताहादरम्यान नामवंत कीर्तनकारांचे सुश्राव्य कीर्तन, धार्मिक प्रवचने तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ नोव्हेंबर रोजी माऊली पाद्यपूजन, दिंडी प्रदक्षिणा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
२४ नोव्हेंबरला काल्याचे कीर्तन व महाप्रसाद यानंतर सप्ताहाची सांगता होईल.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन संजय धुमाळ, कैलास चांदोरे, नागेश कांबरे, रवींद्र डोईफोडे, संतोष लिंबोरे तसेच सर्व तरुण मंडळींकडून करण्यात येत आहे.




