ताज्या बातम्या
‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणीमाजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त २३ जून रोजी मुंबईत व्यापक बैठकपुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेसाठी शासनाने पुढाकार घ्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनएअर इंडिया बिल्डिंगमधील ५० कंत्राटी कामगारांना दिलासा; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सहकार सेनेची यशस्वी पाठपुरावापुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

६० व्या वर्षी उभा केला स्वावलंबनाचा मार्ग देशी कोंबडीपालन अनेक महिलांसाठी प्रेरणादायी

मुंबई(रमेश औताडे) : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वासुद गावात राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेने परिस्थितीशी झुंज देत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घराच्या अंगणात छोटेखानी शेड उभारून देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला असून आज हा उपक्रम गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी सुरुवातीला ५० लहान देशी कोंबड्या खरेदी केल्या. अंगणातच जाळीचे कंपाऊंड करून छोट्या शेडमध्ये त्यांचे संगोपन सुरू केले. मर्यादित साधनसामग्री असतानाही त्यांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा व्यवसाय उभा केला.

देशी कोंबड्यांची अंडी आणि मांसाला ग्रामीण भागात चांगली मागणी असल्याने त्यांना स्थानिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळणार आहे. दररोज कोंबड्यांची काळजी घेणे, स्वच्छता राखणे, योग्य खाद्य देणे आणि सुरक्षितता यावर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कोंबड्या चांगल्या वाढत असून व्यवसाय हळूहळू स्थिर होत आहे.

ग्रामीण भागात अनेक महिला आर्थिक अडचणींमुळे खचून जातात; मात्र या महिलेने पती नसतानाही वयाच्या साठीनंतरही हार न मानता स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या या प्रयत्नामुळे गावातील इतर महिलांनाही कोंबडीपालनासारख्या लघुउद्योगांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.

योग्य मार्गदर्शन आणि सरकारी योजनांचा लाभ मिळाल्यास हा व्यवसाय आणखी व्यापक करण्याचा त्यांचा मानस आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा छोटा उद्योग ग्रामीण महिलांसाठी आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा नवा संदेश देत आहे.

Scroll to Top