ताज्या बातम्या

संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद; मराठी संस्थांचा एकत्रित उपक्रम

नवी मुंबई : मराठी साहित्य संस्कृती व कलामंडळ – नवी मुंबई आणि शिवतुतारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्मा स्मृती दिनानिमित्त “संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम : जिंकूनही हरलेली लढाई…” या विषयी परिसंवादाचे आयोजन गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.

या परिसंवादात प्रमुख मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत. श्री. गोवर्धन देशमुख (मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र), श्री. संजय यादवराव (शिव स्वराज्य मराठी लोक चळवळ), डॉ. दीपक पवार (मराठी अभ्यास केंद्र) हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवी मुंबईतील सर्व मराठी संस्थांना एकत्र आणून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक संस्थेने आपल्या वतीने एक दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

साहित्य संस्कृती व कलामंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी आणि शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० वा. साहित्य मंदिर सभागृह, सेक्रेड हायस्कूलजवळ, सेक्टर ६, नवी मुंबई येथे होणार आहे.

“छाताडावर गोळ्या घेतल्या त्यांनी आपल्यासाठी… चला, पेटवू एक दिवा” या संदेशासह महाराष्ट्रप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top