ताज्या बातम्या

एकाच दिवशी ९९ ग्रामपंचायतींनी केले प्लास्टिकमुक्त गाव; वाई तालुक्यात सातत्याने विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

वाई(विजय जाधव) : वाई तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंगळवार दि.१८ नोव्हेंबर रोजी लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केले. त्याच वेळी संपूर्ण गावांनी कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला. गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्या संकल्पनेतून एकाच दिवशी तब्बल ९९ गावातील हा प्लास्टिक संकलन आणि बंदी घालण्याचा निर्णय लक्षवेधी ठरला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाच्या धर्तीवर, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पाणी, स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुक्यात पंचायत समितीमार्फत प्रत्येक आठवड्याला नाविन्यपूर्ण उपक्रमांची मालिका यशस्वीपणे राबविली जात आहे.

तालुक्यात अधिकारी असूनही सामाजिक कार्यकर्त्यासारखे जलसंधारण, वृक्षसंवर्धन, शिक्षण, आरोग्य यात लक्षवेधी कार्य करणारे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी चांगलीच भरारी घेतली आहे.
त्यांच्या पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशनसह अनेक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासकीय योजना, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सीद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) राहुल देसाई, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली वाई स्वच्छता चषक स्पर्धा, एक दिवस घरकुल व स्वच्छतेसाठी, माझे गाव–माझी जबाबदारी, एक तास स्वच्छतेसाठी अशा उपक्रमांना पुढे नेले असून या उपक्रमांनी तालुक्यात स्वच्छतेची नवी उंची गाठली आहे. मंगळवार दि.१८
रोजी तालुक्यात ९९ ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक संकलन आणि बंदी मोहीम राबविण्यात आली.
तालुकास्तरीय सर्व खाते प्रमुख, अधिकारी , कर्मचारी यांची गावनिहाय संपर्क अधिकाऱ्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्तीची शपथ, सर्व दुकानदारांना प्लास्टिक बंदीच्या नोटिसा देण्यात आल्या.प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला.उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याला प्रतिबंधात्मक स्वच्छता फलक, दंडात्मक सूचना फलक लावण्यात आले. श्रमदानातून गोळा केलेला प्लास्टिक कचरा भंगार विक्रेत्यांना देण्यात आले. त्याचबरोबर घरकुल पूर्णत्व अभियानालाही विशेष चालना देताना मंजूर घरकुलांचे भूमिपूजन, पाया खुदाई आणि अंतिम टप्प्यातील घरकुलांच्या पूर्णत्वानंतर शेवटचा हप्ता वितरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले.सातत्याने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे राज्यभरात चर्चा रंगली आहे ‌या मोहिमेत तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, उत्साही युवक यांनी उत्स्फूर्त सहभाग आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद (आबा) पाटील यांनीदेखील या उपक्रमांचे कौतुक केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top