कराड(प्रताप भणगे) :

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाभियान अंतर्गत आदिवासी कल्याणकारी दूरदर्शी उपक्रमाचा भाग म्हणून मौजे गणेशनगर कोर्टी येथे कातकरी समाजातील बांधवांना घरकुल आणि भूखंडांचे वाटप करण्यात आले. गावातील आठ भूखंडांवर १६ लाभार्थ्यांना नावनोंदणी देण्यात आली असून, तसेच २२ लाभार्थ्यांना घरकुलासाठी मंजूर जागेचे भूमिपूजन करून अधिकृत मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.
कित्येक वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या कातकरी समाजातील अनेक कुटुंबांना या उपक्रमातून मोठा दिलासा मिळाला आहे. हे भूमिपूजन कराड उत्तरचे आमदार माननीय श्री. मनोजदादा घोरपडे यांचे बंधू मा. श्री. विक्रमनाना घोरपडे व मा. श्री. विश्वास सिद (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाला मा. श्री. प्रताप पाटील (गटविकास अधिकारी), सौ. सनमती देशमाने (शिक्षण विस्तार अधिकारी), विकास स्वामी (प्रशासक), सागर बोलके, महेश बाबा जाधव, वानारसे मॅडम, योगीराज सरकाळे, शहाजी मोहिते, जयवंत नाना जाधव, जगन्नाथ थोरात, अंकुश थोरात, भीमराव थोरात, सुनील यादव, सुनिता पाटेकर, अजित थोरात, जयराज थोरात, अमोल थोरात, महेश थोरात, शंकर वाजे, गणेश थोरात, योगेश मोरे, रवींद्र यादव, धनाजी काळे, सूरज वायदंडे, गणेश काळे, विजय धोत्रे, रमेश वायदंडे यांसह गणेशनगर–कोर्टी येथील नागरिक तसेच कातकरी समाजातील मोठ्या संख्येने महिला–पुरुष उपस्थित होते.
📌 कोर्टी, ता. कराड येथे PM JANMAN अंतर्गत मंजूर २२ घरकुलांचे भूमिपूजन विशेष उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी, पंचायत समितीतील अधिकारी, CC समूह व्यवस्थापक, RHE, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व सर्व लाभार्थी सहभागी झाले.




