
मुंबई (शांताराम गुडेकर) : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विविध लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोध करत जनजागृती करण्याचे महान कार्य अनेक लोकशाहीर, लोककलावंतांनी केला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला गौरवशाली सांस्कृतिक – परंपरा कायम आहे.महाराष्ट्रातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या असताना कोकणात अनेक गाव-वाडी कुशीत काही लोककला फक्त सणासुदीलाच सादरीकरण होत असून त्या मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, व्यावसायिक झाल्या पाहिजेत यासाठी कोकणातील बरेच लोक आपआपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत. त्यापैकीचं एक कोकणात नावलौकिक मिळवलेले बळीवंश कलामंच ( ता. गुहागर,जि. रत्नागिरी ) हा कलामंच आहे.आयोजनातील अग्रेसर असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे कोकणातील बहुप्रिय लोककला नमन कलेचा या मोसमातील शुभारंभाचा प्रयोग मंगळवार दि.११ नोव्हेंबर २०२५,रोजी रात्रौ ८.३० वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, (पूर्व) मुबंई येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम दरम्यान श्री.संदीप तुकाराम सावंत,श्री.सतिश रामचंद्र जोशी यांना श्री.पाणबुडी देवी ,मुंबई पुरस्कृत स्व.शंकर ( दादा ) गोमाणे स्मृती प्रित्यर्थ नमन लोककला गौरव पुरस्कार – २०२५ तर श्री.अनंत अशोक शेनॉय यांना श्री.पाणबुडी देवी कलामंच,मुंबई पुरस्कृत स्व.शंकर ( दादा ) गोमाणे स्मृती प्रित्यर्थ भजन सम्राट पुरस्कार – २०२५ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.शिवश्री सागर बबन डावल या नवोदित नमन कलावंत यांनी अल्पवधीत अनेक वगनाट्य लेखन केले आहे.त्यातीलच नवी कलाकृती “संस्कार” यावेळी पहायला मिळेल.समाजप्रबोधन विषयक लिखाण मधून ते कायम वेगवेगळे संदेश देण्याचे काम ते करत आले आहेत.अथक परिश्रम पूर्वक निर्मितीतून साकारलेल्या या नमन प्रयोगाला कोकणवासीय मुंबईकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी दिपक कारकर- ९९३०५८५१५३,रमेश भेकरे-९५९४३५२८६३,संतोष घाणेकर- ९८३३६८९६४२,रमेश कोकमकर – ८८५०४२२७११ यांच्याशी संपर्क साधवा.
