मुंबई : बॉलिवूड आणि नृत्यकला विश्वावर आज शोककळा पसरली आहे. दिग्गज अभिनेत्री व प्रख्यात नर्तकी मधुमती यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीसह संपूर्ण कलाक्षेत्रावर दु:खाचा सागर उसळला आहे.
मधुमती यांनी आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्य आणि प्रभावी अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. “अंखें”, “टॉवर हाऊस”, “मुझे जीने दो”, “शिकारी” अशा अनेक चित्रपटांत त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. त्यांची नृत्यकला म्हणजे भाव, लय आणि सौंदर्य यांचं अद्वितीय मिश्रण होतं.
त्यांनी स्वतःची नृत्य अकादमी स्थापन करून नव्या पिढीतील अनेक कलाकारांना प्रशिक्षण दिलं. अनेक नामांकित कलाकारांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याची कला आत्मसात केली. मधुमती यांनी केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर भारतीय नृत्यसंस्कृतीतही अमूल्य योगदान दिलं.
त्यांच्या निधनानंतर सहकारी कलाकार, शिष्य आणि चाहत्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
धगधगती मुंबईतर्फे श्रद्धांजली
धगधगती मुंबई परिवार त्यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:ख व्यक्त करतो.
कलाक्षेत्रातील त्यांचं योगदान अमूल्य आहे. त्यांची नृत्यकला, शिस्त आणि कलाप्रेम ही पुढच्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.
आमच्याकडून दिवंगत मधुमतीजींना भावपूर्ण श्रद्धांजली.