विरार(उत्कर्ष गुडेकर) : अखंड महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेले महाराष्ट्र सुपरफास्ट न्युज चैनल व जनपहारा साप्ताहिक वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्थंम्ब म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून निस्वार्थी सामाजिक व विविध प्रकारच्या घटकांतील समस्याना व नागरिकांच्या विविध गैरसोयीवर आवाज उठवून शासन दरबारी न्याय मिळवुन देण्याचा अधिकारांचा वापर करून स्वतःचे १७ वर्षे अस्तित्व टिकवून ठेवले. महाराष्ट्र सुपरफास्ट न्युज आणि जनपहारा साप्ताहिक वृत्तपत्र यांचे रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी नालासोपारा डीवाईन स्कुल, विजय नगर येथे स्नेहसंमेलन तथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.सुरुवातीला प्रतिनिधी प्रवीण पारावे यांनी श्रीफळ वाढवून सुरुवात केली. वृत्तपत्र दर्पणकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला प्रतिनिधी श्री.समीर चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.तर या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने श्री सत्यनारायण पूजा घालून झाली.विशेषतः सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यक्रमात कुटुंबासहित सहभागी झाले होते.प्रत्येक प्रतिनिधीना कुटुंबासहित सन्मानित करण्यात आले. व काही प्रतिनिधीना उत्कृष्ट सोबती हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे अखंड महाराष्ट्रभर रात्री- अपरात्री, प्रसंगी स्वतः उपस्थित राहून वैद्यकीय क्षेत्रात आणि गरजूना, गरिबांना, अनाथ-अपंगांना व कर्णबधिराना आणि कला क्रीडा शैक्षणिक अशा विविध प्रकारची मदत केलेल्या सर्व रुग्णसेवक, पोलीस, डॉक्टर, शासकीय अधिकारी, समाजसेवक, ब्लड बँक, सामाजिक नेतृत्व, पत्रकार, सफाईदूत, कलाकार, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील, सामाजिक संस्था, मान्यवराना महाराष्ट्र सुपरफास्ट न्युज व जनपहारा वृत्तपत्राच्या वतीने (समाजभूषण पुरस्कार), (समाज प्रेरणा पुरस्कार ), (देवमाणूस पुरस्कार ), (क्रांतिजोती सावित्रीबाई फुले पुरस्कार ), (कलारत्न पुरस्कार) आणि (उत्तम उद्योजग पुरस्कार ) अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्रथम समाजसेवक, ग्रामीण भागातील सरपंच याना समाज प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर डॉक्टर, रुग्णसेवक, नर्स, केईएम हॉस्पिटल, जे जे हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल व अन्य ठिकाणी असलेल्या रुग्णालयात मदत केलेल्या सर्वाना देवमाणूस पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच पद्धतीने अखंड महाराष्ट्रातील महिलांना प्रेरणादायी ठरणारे महिला कर्तृत्व या कर्तव्यांची जाण ठेऊन दहा महिलांना क्रांतिजोती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.होतकरू कलाकार म्हणून विविध कला क्षेत्रात आपली कला सादर करून रसिकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणाऱ्या चित्रपट, नाटक, नमन, लघुपट अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कलाकारांना महाराष्ट्र सुपरफास्ट न्युज कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर शून्यातून विश्व निर्माण करून व्यवसाय सुरू केला आणि काही दिवसातच उतुंग शिखरावर यश प्राप्त केलेल्या उद्योजकाना उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे अधिकारी श्री.योगेशजी पाटील, समाजसेवक डॉ संजय जाधव, हुमन राईट्स अध्यक्ष व रुग्णसेवक समाजसेवक श्री.नरेश मोरे सर, मा. नगरसेवक अमितजी वैद्य सर, समाजसेवक ब्रिजेश शुक्ला, श्री निलेश तेलंगे, ट्रॅफिक पोलीस पूजा कांबळे मॅडम, पोलीस अधिकारी श्री सावंत साहेब व अन्य सहकारी, पत्रकार श्री. शांताराम गुडेकर, साम टीव्ही श्री.कानडे, अन्य पत्रकार तसेच समाजसेवक श्री. राजेश पोरे सर, कलाकार कोकणी निखिल श्री.निखिल सकपाळ, कलाकार अमोल भाताडे, शाहीर संदेश पालकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. अधिकारी वर्ग डॉक्टर, रुग्णसेवक, पोलीस अधिकारी, समाजसेवक, सफाईदूत, व्यवसायिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना खास करून महाराष्ट्र सुपरफास्ट न्युज व जनपहारा वृत्तपत्राचे संपादक श्री.जितेंद्रजी शिंदे यांचे कौतुक केले तर आपल्या वर्धापन दिनी आमच्या कर्तुत्वाची जाण ठेऊन आम्हाला सन्मान दिला त्या बद्दल आभार व्यक्त केले.तर रुग्णसेवक म्हणून सन्मान घेताना आम्ही केलेल्या मदतीची जाण महाराष्ट्र सुपरफास्ट न्युजने ठेवली म्हणून काही देवदूतांनी महाराष्ट्र सुपरफास्ट न्युजचे आभार मानले. तर समाजसेवक आणि अन्य मान्यवरांच्या वतीने देखील पत्रकार प्रतिनिधीचे कौतुक करण्यात आले.या सोहळ्याला खास करून प्रत्येक प्रतिनिधीचे कुटुंब उपस्थित असल्याने कार्यक्रमात खास आकर्षण निर्माण झाले होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिनिधी पत्रकार कु.मनाली करण मॅडम,सौ.एकता दरेकर मॅडम यांनी केले तर पत्रकार म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रतिनिधी कु. उज्वला मॅडम,श्री. बिरवाडकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संपादक यांचे आभार मानले.या कार्यक्रमाची जबाबदारी सर्व प्रतिनिधीनी आपल्या शिरावर पेलून कार्यक्रम उत्कृष्ट रित्या सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपसंपादक श्री. दीपक मांडवकर व मुख्य संपादक श्री.जितेंद्रजी शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले व शेवट पर्यंत साथ द्या अशी निस्वार्थी साद घातली आणि कार्यक्रमाची सांगता केली.
महाराष्ट्र सुपरफास्ट न्युज आणि जनपहारा वृत्तपत्राचा १७ वा वर्धापनदिन उत्स्फूर्तपणे साजरा
RELATED ARTICLES