Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रघाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर महाराष्ट्र गौरव पुरस्कार -२०२५...

घाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर महाराष्ट्र गौरव पुरस्कार -२०२५ ने सन्मानित

मुंबई (शांताराम गुडेकर) : देशाच्या हितासाठी, सर्वांच्याच सेवेसाठी इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन, मुंबई व सहकर्म सामाजिक कल्याण फाऊंडेशन (रजि.)तर्फे राज्यस्तरीय “महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२०२५”वितरण सोहळा नुकताच पार पडला.या प्रसंगी महाराष्ट्रातील आदर्श समाज सेवक तसेच कारगिल युद्धात प्राणपणाने लढलेल्या सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.विक्रोळी येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक,मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार -२०२५ ने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.शिवकुमार साळुंखे(अतिरिक्त आयुक्त, GST, पुणे)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. विजय दामजीभाई बाघेला(मुख्य समीक्षक, मुंबई विभागीय मंडळ),मा.श्री.संदिप रमेश हिंदु( धर्मरक्षक, इगतपुरी),मा.श्री.महेंद्र गोवर्धन गवई (इंडियन आर्मी),मा.डॉ. सुमिन्ना डी. पाटील(महिला उद्योजिका, कोल्हापूर),मा.सौ.साक्षी नाईक( मराठी अभिनेत्री),मा.सौ.शकुंतला दि. तायडे( डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेत्या),राज्यस्तरीय
महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ मा.सौ. काजल दिनेश सुर्वे(मुख्य शिक्षीका, सेंट चाल्र्स हायस्कूल),मा.सौ. मेहराजुनिसा अब्दुल शकील(जेष्ठ समाजसेविका, अमरावती), आयोजक रामजीत (जितु)गुप्ता(आय.सी.पी.),आयोजक शितल माणिक पाटील(अध्यक्ष -सहकर्म सामाजिक कल्याण फाऊंडेशन (रजि.)आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार याना विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार -२०२५ रविवारी (५ ऑक्टोबर )देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार साठी संस्थेनेसामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता,साहित्य,वैद्यकीय,क्रीडा आदींचा समावेश केला आहे.सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत.तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, सचिव संदीप चादीवडे रामचंद्र चिखलकर, दौलत बेल्हेकर , वसंत घडशी, गंधाली मयेकर, राजेंद्र पेडणेकर, संतोष चादे, सुनील पिंपळे, विश्वास तेली, , संतोष होलब, यांच्या सहकार्यने यशवंत खोपकर सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments