Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार; पुण्यातील टिळक स्मारक...

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार; पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात १२ ऑक्टोबर रोजी होणार वितरण

पुणे : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘या पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्काराचे वितरण देखील याप्रसंगी होणार आहे.
‘‘समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणाऱ्या शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री पदावर करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा, अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे. शिंदेंच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वाढण्यास मदत होईल’’ असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष पं. अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केले.
याआधी हा पुरस्कार उज्वल निकम, शेषराव मोरे, भरतकुमार राऊत, देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे. कार्यक्रमास जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अंकित काणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments