तळमावले/वार्ताहर : महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त कार्यालय संलग्न आणि आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन प्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड माईंगडेवाडी, (जिंती) येथील श्लोक लव डिसले यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे यांनी दिली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि.25 ऑक्टोबर, 2025 रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
इ.5वी मध्ये शिकत असलेल्या श्लोक डिसले याने जय जय स्वामी समर्थ, काव्यांजली, निवेदिता माझी ताई, पिंगा ग पोरी पिंगा या मालिका, व्हॅनिश ॲड, शासकीय जाहिरात, झीबा बासमती राईस इ.जाहिराती, राक्षस, शक्तिमान मुले युक्तिमान, मातृत्व, रामायण, खेळ नाटकाचा इ.नाटके, कूटनीती, दृष्टिकोन, वाचाल तर वाचाल, पत्रास कारण की इ.शॉर्ट फिल्म्स मध्ये अभिनय केला आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारही वितरित केले जाणार आहेत. तसेच सेल्फी विथ गुढी स्पर्धा, निबंध स्पर्धा इ.या स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान केला जाणार आहे.
स्पंदन ट्रस्टच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येते. या पुरस्काराबद्दल श्लोक लव डिसले यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.