ताज्या बातम्या

मराठा समाज – नवी मुंबईत दसरा स्नेह संमेलन; विद्यार्थी गुणगौरव सोहळा

नवी मुंबई : मराठा समाज – नवी मुंबई तर्फे दसरा स्नेह संमेलन गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५ वा. श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, मराठा भवन, सेक्टर १५, वाशी येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. रवींद्र उखा पाटील (अध्यक्ष, शिवतुतारी प्रतिष्ठान, कोपरखैरणे) उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाला अध्यक्षस्थान डॉ. विजय लक्ष्मणराव कदम भूषवणार आहेत. तसेच श्री. गंगाराम रामाजीराव मोरे (उपाध्यक्ष), श्री. श्याम अमृतराव महाडिक (कार्यवाहक), श्री. वसंत जिजाबा तरडे (सहकार्यवाहक), सौ. अमरजा सुभाष चव्हाण (कोषाध्यक्षा) यांच्यासह सर्व संचालक मंडळ व मराठा समाज महिला मंडळ कार्यरत आहे. विशेष आकर्षण म्हणून, मार्च २०२५ मध्ये झालेल्या शालांत व उच्च शिक्षणाच्या परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या व विशेष प्राविण्य संपादन केलेल्या मुला-मुलींचा सत्कार समारंभ सायं. ६ वाजता होणार आहे.

संमेलनात सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top