Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रदसऱ्याचे महत्व काय?

दसऱ्याचे महत्व काय?

पनवेल(अमोल पाटील) : दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सन. हा सण विजयादशमीचा सण म्हणून ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणार दसरा सण सर्वांसाठी उत्साह आणि चैतन्याचा वातावरण घेऊन येतो. 2 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जाईल. दुसऱ्याला सोन्याचे प्रत्येक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते.
चतुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रत्येक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने ,पाटी ,पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा, शक्ती , ज्ञानसंपदा या तीन शक्ति देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्र बसवलेली देवीची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते.
दसऱ्याच्या दिवशी मित्रांना आप्तेष्टांना नातेवाईकांना मापतेची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोनिया नाण्यांचा रूपाने संपत्ती घरी आणत असत. विजय किल्लेदार मोहिमेवरून परत आले की त्यांची होत असे. देवापुढे आणलेले सोने देवापुढे ठेवत असे. देवाला आणि वडील व्यक्तीला नमस्कार करून आशीर्वाद घेत असत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments