ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त बोरीवलीत मोफत नेत्र चिकित्सा शिबीर

प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” साजरा केला जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बोरीवली (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज बालवाडी, राजेंद्र नगर येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे मार्गदर्शन आमदार संजय उपाध्याय यांनी केले. कार्यक्रमाला माजी नगरसेविका आसावरी पाटील, श्यामराव कदम, विजयानंद पेडणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोफत नेत्र तपासणी शिबिरामुळे परिसरातील अनेक नागरिकांना थेट लाभ झाला. भाजपा कार्यकर्त्यांनी सेवा पंधरवड्याचे सामाजिक कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदवला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top