Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रअजिंक्यतारा सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्य महोत्सव उत्साहात...

अजिंक्यतारा सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्य महोत्सव उत्साहात पार पडला

नवी मुंबई (कोपरखैरणे), दि. २८ सप्टेंबर :

अजिंक्यतारा सहकारी पतसंस्थेची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्य महोत्सव सोहळा संस्थेचे अध्यक्ष

बाळासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आनंदमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री गणेश, श्री लक्ष्मी, श्री सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. सभासदांचे स्वागत उपाध्यक्ष महादेव कळंबे यांनी केले. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सभेत मागील सभेचा अहवाल वाचनानंतर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पतसंस्थेला झालेला एकूण निव्वळ नफा रु. ४६,३१,५३९.६९ असल्याची माहिती देण्यात आली. सभासदांच्या मंजुरीनंतर १०% लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी २५ वर्षांचा लेखाजोखा मांडला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सर्व सभासदांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास डक्युमेंटरीच्या माध्यमातून सभासदांसमोर सादर करण्यात आला. सचिव शंकर गोळे यांनी शुभेच्छा दिल्या, तर सूत्रसंचालन किसन शिंदे यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, लेखापरीक्षक, कायदेशीर सल्लागार, मान्यवर, कर्मचारी, बहुसंख्य सभासद व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी केले.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments