मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, धारावी विधानसभा शाखा अध्यक्षपदी (प्रभाग क्र. 183) विवेक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते विवेक कांबळे यांनी नियुक्तीपत्र स्वीकारले. या नियुक्तीबाबत पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येयधोरणे व कार्यक्रम निष्ठेने राबवावेत. कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही. समाजाला उपद्रव न होता मराठी बांधव, भगिनी आणि मातांना अभिमान वाटेल असे कार्य घडवावे,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नियुक्ती एक वर्षासाठी देण्यात आली असून, कार्याचा आढावा घेऊन पुढील मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विवेक कांबळे यांच्या या नियुक्तीने धारावीतील मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.