Tuesday, September 16, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार : ॲड...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार : ॲड आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडको मार्फत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले.
मंत्रालय मध्ये अटल सेतु जवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत आयोजित बैठकीत. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार बोलत होते. यावेळी या बैठकीला आमदार महेश बालदि, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, सिडको आणि एमएमआरडी चे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला समृध्द ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे.या सांस्कृतिक वार्षा ची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जगभरातील पर्यटक येतील, त्यावेळी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कृती माहिती होण्यासाठी अटल सेतू जवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत निधी मागण्याचा प्रस्ताव तयार करा. सिडकोने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून मान्यता घेवून या कामाला गती द्यावी.सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याच्या अनुषंगाने विविध परवानग्या विभागाने घेण्यात याव्यात असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments