मुंबई (शांताराम गुडेकर) : बालपणापासून गायन व संगीताची आवड असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या निवे खुर्द येथील शाहीर जयंत राजाराम चव्हाण( उर्फ बापू) यांनी वयाच्या १७ व्या वर्षी गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी रा. खेड यांच्या मार्गदर्शनाखाली , कोकणातील प्रसिद्ध लोककला जाखडी, नमन या क्षेत्रात पहीले पाऊल ठेवले आणि यशस्वीपणे गेली ४०वर्ष ही कला जोपासत आहेत.कलगीतुरा समन्वय समिती संगमेश्वर देवरुखचे गेली २५ वर्ष ते उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.सामाजिक, क्षेत्रात ही बापू अग्रेसर आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत मा.माजी आमदार सुभाषजी बने साहेब यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री महोदय यांनी मंजूरी दिली.राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समिती(जिल्हा रत्नागिरी)मध्ये शाहीर जयंत राजाराम चव्हाण( उर्फ बापू) यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.संगमेश्वर तालुक्यातील सर्व कलेतील कलावंतांना याचा निश्चित पणे फायदा होणार आहे.त्यांची नियुक्ती जाहिर होताच संगमेश्वर तालुक्यातून शाहीर बापू चव्हाण यांना कलावंताकडून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समिती(रत्नागिरी) वर शाहीर जयंत राजाराम चव्हाण यांची सदस्य पदी निवड
RELATED ARTICLES