कराड(प्रताप भणगे) : यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा केंद्र ओंड येथे आयोजित क्रीडा स्पर्धा वनश्रीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन यश मिळवले. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेत कु. ईश्वरी दत्तात्रय खोत हिने 100 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला, तर तनिश संदीप पांढरे याने 200 मीटर शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.