ताज्या बातम्या
“शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार” ; रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरणमहात्मा जोतीराव फुले : समानतेच्या संघर्षाचा तेजोदीपजी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांकएमपीडीए कारवाई रद्द न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खुनाच्या धमक्या; खेड पोलिसांत गुन्हा दाखल“राज्याची तिजोरी जनतेचीच – शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार.” ; लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

एआय तंत्रज्ञान आणि सायबर सिक्युरिटी बाबत माहिती हवी साताऱ्यात पत्रकारांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सातारा(विजय जाधव) :

संगणक आणि मोबाईल वापर ही मानवी गरज झाली आहे. त्याच्या सुरक्षित वापराबद्दल ज्ञान नसल्याने हॅकर ऑनलाईन फसवणूक करतात. सायबर सिक्युरिटी सोबत एआय तंत्रज्ञानाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. पत्रकारांनी स्वतः ज्ञान घेऊन सामाजिक बांधिलकीतून इतरांना याबाबत सतर्क आणि सक्षम करावे, असे आवाहन संचालक डॉ.बी.एस. सावंत यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आणि केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सोबत सातारा तालुका, शहर पत्रकार संघाने पत्रकारांसाठी सायबर सिक्युरिटी आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर यावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी वर्ये येथे केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये संगणक लॅबमध्ये ही प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि सराव अशी ही कार्यशाळा पार पाडली.

कार्यशाळेचे उद् घाटन केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी.एस.सावंत , पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, सुनिल साबळे, किरण गाडे ,प्रा.प्रियांका लोखंडे आदींच्या उपस्थितीत झाले.

सायबर सिक्युरिटी बाबत ओमकार कदम, आयुष माने आणि टीमने अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी माहिती दिली. तर प्रा.प्रियांका लोखंडे यांनी, उपस्थित पत्रकारांना विविध एआय तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा हे प्रत्यक्षात संगणकावर सराव करत प्रशिक्षण दिले. याच बरोबर तंत्रज्ञानाचे संभाव्य धोके याबाबत दक्षता काय घेतली पाहिजे, याची अत्यंत उपयुक्त माहिती दिली.

प्रास्ताविक प्राचार्य विजय जाधव तर सुत्रसंचलन जान्हवी चोरगे आणि नेहा चिंचकर तर आभार प्रा.प्रियांका लोखंडे यांनी मानले.
केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी
सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती करणारे प्रबोधनपर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले.
.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top