कराड(प्रताप भणगे) : मौजे नांदलापूर नारायणवाडी, पाचवड, वस्ती (कापील) कोडोली ता. कराड येथील कृष्णा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकामाकरिता जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने घेण्यात येणा-या प्रस्तावमधील जमिनीच्या मोबदल्यासाठी आर्थिक तरतूद होणे कामी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी राष्ट्रवादी पक्षप्रेवाशा वेळी मागणी केली होती त्यास यश येऊन ४कोटी निधी उपलब्ध झालेने पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील कराड दक्षिणचा पश्चिम डोंगराळ भाग व पूर्वेकडील कृष्णा काठ जोडण्यासाठी माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील यांनी पाचवड येथील कृष्णा नदीवरील पुलाची संकल्पना मांडून पुलाची मागणी केली होती. त्यानुसार या पुलाचे काम प्रगतीत आहे. एकंदर४ पिलरचे बांधकाम पूर्ण झाले असून मौजे कोडोली ता. कराड बाजूकडे ८४० मीटर लांबीचा जोड रस्ता नव्याने तयार करावयाचा आहे तर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ जोडणारा अस्तित्वातील ६५० मी. लांबीचा रस्ता १२ मीटर रुंदीने करण्यासाठी भू. संपादन प्रस्ताव तयार केलेला आहे. यामध्ये मौजे नांदलापूर,कोडोली, नारायणवाडी, पाचवड (वस्ती) (कापील) या गावातील एकदर २७ गट हद्दीतून हे जोड रस्ते जात आहेत. या भू. संपादन प्रस्तावाची एकूण किंमत रु.४ कोटी इतकी आहे. सदर रककम बाधित शेतक-यांना अदा करण्यासाठी रु.४ कोटी इतक्या रककमेची शासनाकडे मागणी करण्यात आली होती. हि रक्कम प्राप्त झालेने संबधित बाधित शेतक-यांना तत्काळ या रकमेचे वाटप करण्यात येवून उर्वरित काम सुरु करून ते लवकर पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करणेत येत आहे.शासनाकडून हा निधी उपलब्ध झालेने शासनाचे ॲड उदयसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत.
पाचवड पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी; राष्ट्रवादीचे नेते ॲड उदयसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश
RELATED ARTICLES