कोदिवले : कोदिवले येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दहिवली ग्रामपंचायतचे माजी सदस्य जनार्धन लक्ष्मण तरे यांच्या मातोश्री कै. भागीरथी लक्ष्मण तरे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या नव्वदीत आज अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भागीरथी आजी या वारकरी साम्प्रदायात अनेकवर्ष भक्तीभावाने सेवा करत होत्या. पंढरपूर, देहू आळंदी येथील माऊलींच्या भेटीसाठी आषाढी, कार्तिकी एकादशीला न चुकता गेली अनेक वर्ष पोहचत. त्यांचा स्वभाव अतिशय मायाळू आणि प्रेमळ असल्याने लहानांपासून मोठ्यांना नेहमीच आदरांने आणि आपुलकीने विचारपूस करत. आज या माऊलीच्या जाण्याने समस्त तरे कुटुंबावर दुःखांचा आघात झाला असून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठ्या संख्येने आप्तेष्ट उपस्थित होते.