Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणावरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात

मराठा आरक्षणावरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात

प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारमध्येच वेगवेगळी भूमिका दिसून येत असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परशुराम महामंडळवाले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंदोलकांना मदत करून फडणवीसांना अडचणीत आणत आहेत.”

त्यांनी फडणवीस सरकारवर टीका करताना प्रश्न उपस्थित केला की, “आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबानी केली म्हणावी लागेल का? राजकीय इच्छाशक्ती असती तर एका दिवसात आरक्षण दिले गेले असते, पण ती इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली आहे.”

राऊत यांनी पुढे सुचवले की, मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून सर्वांना एकत्र घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला हवी होती. तसेच, “आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत नसेल तर संविधानाच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे. यासाठी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जावे. अमित शहा यांनी गणपतीला जाण्यापूर्वी जरांगे पाटील यांची भेट घ्यायला हवी होती, आणि फडणवीसांनी त्यांना न्यायला हवे होते,” असा सल्लाही दिला.

“राजकारण आणि चमकोगिरी सुरू असून, शिंदे आंदोलकांना मदत करत आहेत फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी, तर अजित पवार तटस्थ आहेत. ही आहे का राजकीय इच्छाशक्ती?” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments