मुंबई : आझाद मैदानावर सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून व्यापक नागरी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पावसामुळे झालेल्या अडचणी दूर करून आंदोलकांना आवश्यक सर्व सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महापालिकेने केलेली व्यवस्था :
- सततच्या पावसामुळे झालेला चिखल दूर करून मैदानाच्या प्रवेशमार्गावर २ ट्रक खडी टाकून मार्ग समतल करण्यात आला.
- परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था यावी यासाठी अग्निशमन दलामार्फत प्रखर झोताचे दिवे उभारण्यात आले.
- आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स उपलब्ध करून देण्यात आले असून अतिरिक्त टँकर्स मागवले आहेत.
- सातत्याने स्वच्छतेसाठी समर्पित कर्मचारी नेमण्यात आले असून परिसरात वैद्यकीय मदत कक्ष उभारले आहेत.
- ४ वैद्यकीय पथके, २ रुग्णवाहिका आणि १०८ रुग्णवाहिका सेवा २४ तास उपलब्ध आहेत.
- मैदानात २९ विनामूल्य शौचालये, महात्मा गांधी मार्गावर ३० फिरती शौचालये, मेट्रो साइट शेजारी १२ पोर्टेबल शौचालये तर फॅशन स्ट्रीट परिसरात २५० फिरती शौचालये अशी एकूण मोठ्या प्रमाणावर शौचालय व्यवस्था करण्यात आली आहे.
- कीटकनाशक धूरफवारणीसाठी स्वतंत्र २ पथके कार्यरत असून पावसाळी परिस्थितीमध्ये नियमित फवारणी केली जात आहे.
- महापालिकेचे स्थानिक अधिकारी सातत्याने पाहणी करत असून अतिरिक्त कर्मचारी नेमले गेले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान परिसरातील कोणतेही उपाहारगृह, खाद्यपदार्थ दुकाने किंवा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केलेला नाही. काही लोक अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र सर्व गोष्टी सुरळीत सुरु आहेत.
दरम्यान, आंदोलनाच्या दरम्यान काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या हिंसाचाराचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही निषेध नोंदवला आहे.