Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रमराठा क्रांती मोर्चाची आंदोलनाची वेळ वाढविण्याची मागणी

मराठा क्रांती मोर्चाची आंदोलनाची वेळ वाढविण्याची मागणी

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाने पोलिस प्रशासनाकडे आंदोलनाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. सध्या आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत एक दिवस संध्याकाळपर्यंतची आहे. मात्र मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते मैदानावर दाखल झाल्याने वेळ अपुरी पडत असल्याचे कारण मोर्चाच्या नेत्यांनी दिले आहे.

या संदर्भात मोर्चाच्या प्रतिनिधींनी झोन-१ चे डीसीपी प्रवीण मुंढे यांना लेखी पत्र दिले असून, उद्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी मागितली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर आंदोलनकर्त्यांनी गर्दी केली होती संध्याकाळी कर्मचारी कामावरून सुटण्याची वेळ व आंदोलन संपवण्याची वेळ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments