मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गणपती आरती संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना नेते, सचिव व विभागीय खासदार मा. श्री. अनिलभाऊ देसाई यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे संपन्न झाले.
या प्रकाशन सोहळ्यास सायन-कोळीवाडा विधानसभा प्रमुख श्री. गोपाळ शेलार, वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे, ग्रा.सं.कक्षाचे सचिव श्री. राजेश कुचिक, श्री. निखिल सावंत, माजी शाखाप्रमुख श्री. बी.के. शिवलकर, युवासेना शाखा क्र. २०१ चे शाखाधिकारी रोहन सुरेश काळे, तसेच ग्रा.सं.कक्ष सायन-कोळीवाडा विधानसभा कक्ष संघटक श्री. सुशीलकुमार सुंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी उपयुक्त ठरणारे हे पुस्तक आगामी उत्सवात सर्वत्र उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.