मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आज (26 ऑगस्ट) सकाळी 8 ते 11 या वेळेत संगम प्रतिष्ठान, आयपीसीए यांच्या विद्यमाने आणि कोका-कोला इंडिया प्रा. लि. यांच्या पुढाकाराने ‘पेट बॉटल कलेक्शन आणि रिसायकल ड्राइव्ह’चा शुभारंभ कीर्ती कॉलेज सभागृहात झाला. शेकडो स्वयंसेवक, एनएसएस विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
या उद्घाटनप्रसंगी सिद्धिविनायक ट्रस्टचे खजिनदार आचार्य पवन त्रिपाठी आणि वेदांत लालवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजचे तुषार पटनायक, कोका-कोला इंडियाच्या दिव्या अग्रवाल यांच्यासह अल्फा जी, अंकित बॅनर्जी, जीवन प्रीत सिंह यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना संपूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
संगम प्रतिष्ठानचे सचिव अँड
. कोमल घाग आणि आयपीसीएचे प्रमुख प्रवीण लोखंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “गणेशोत्सव स्वच्छ आणि पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी हा उपक्रम लोकाभिमुख करून व्यापक प्रमाणात राबवला जाईल,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन पर्यावरणप्रेमी तानाजी घाग यांनी केले. पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करत दादर बीचवर स्वच्छता मोहिमेने उपक्रमाची सांगता झाली.