प्रतिनिधी : परंपरा, संगीत आणि नृत्याचा संगम घडवून आणणारा ‘रंगरास नवरात्री २०२५’ हा भव्य सोहळा चौथ्या वर्षी अधिक भव्यतेने आयोजित केला जात आहे. २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान, बोरिवली (पश्चिम) येथे दररोज सायं. ७ वाजल्यापासून हा उत्सव रंगणार आहे.
रायगड प्रतिष्ठान तर्फे, महावीर कन्स्ट्रक्शन व सॉलिटेअर एज यांच्या सहकार्याने हा उपक्रम होत असून, विधान परिषदेचे गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे.
आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, नवरात्री हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून श्रद्धा, संस्कृती आणि समाजातील एकतेचे प्रतीक आहे. ‘रंगरास नवरात्री’ने मुंबईकरांच्या उत्सवाला एक वेगळे स्थान दिले असून, यंदा आणखी भव्य आयोजन होणार आहे.