कोंढवे(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील हमदाबाज गावात १५ लाखाची ग्रामपंचायत बांधण्यात आली. परंतु घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बसवला नाही. मागासवर्गीयांसाठी असलेले अनुदान दिले नाही. यामुळे काही जातीय वाद्यांमुळे बौद्ध समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप युवा नेते व रिपब्लिकन सेना जिल्हा युवक अध्यक्ष वैभव गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड यांनी केला आहे.
हमदाबाज हे गाव सातारा तालुक्यात असून या गावात भिम शायरीतून नेहमीच शाहीर वैभव गायकवाड हे संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दूर होण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे गावातील काही सनातनी व जातीयवादी प्रवृत्तीने बौद्ध समाजाला घटनेच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. याबाबत सातारा पंचायत समिती व जिल्हा परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हमदाबाज येथील बौद्ध समाजाने ग्रामपंचायतला चांगलेच धारेवर धरले आहे.
हमदाबाज ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करावी . मागासवर्गीय १५ टक्के अनुदान निधी इतरत्र वळवल्याने सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा. अशी जोरदार मागणी केली आहे.सरपंच यांनी वैयक्तिक लाभ घेतलेला आहे, सरपंच व ग्रामसेविका यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत भ्रष्ट कारभार चालवलेला आहे. कागदावर बिल काढलेले आहे. मात्र, वास्तवामध्ये काम नाही, बोगस पद्धतीचे कामे दाखवून आर्थिक मलिदा लाटलेला आहे. त्यामुळे समाज भावनेमध्ये निधी चोरीला गेलेला आहे की काय? अशी भावना निर्माण झाली आहे.
हमदाबाज ग्रामपंचायतल दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे भारतीय संविधानाचे पूजन करून आंदोलन केले . त्यानंतर सातारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री दळवी आल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या सहीचे पत्र देत सदर भ्रष्टाचार प्रकरणाची आठ दिवसात सखोल चौकशी करण्याचे लेखी कळवले. त्यामुळे आंदोलन स्थगित केले आहे.
यावेळी वैभव गायकवाड, रमेश गायकवाड, सुरज होवाळे, चंद्रकांत साळुंखे, प्रशांत जाधव, हनुमंत जाधव, विशाल साळुंखे, नारायण जाधव इतर हमदाबाजचे नागरिक उपस्थित होते. गावात जातीय सलोखा असताना सुद्धा काही जातीयवादी प्रवृत्ती जातीयवाद पेटवण्यासाठी खतपाणी गाळत असल्याचा आरोप गावातील पुरोगामी कार्यकर्त्यांनी केला आहे.
——- ——- ——– —— —– ग्ग्ग&!
फोटो — हमदाबाज ग्रामपंचायत समोर आंदोलन करताना बौद्ध कार्यकर्ते व महिला
(छाया — अजित जगताप ,कोंडवे )