मुंबई : साहित्य संघ मंदिररच्या निवडणुकीत पंधरा वर्षांनंतर प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. उर्जा पॅनल गेली पंधरा वर्षे सत्तेवर असून, यंदा डॉ. भालेराव पॅनलने जोरदार आव्हान दिले आहे. या निवडणुकीत मते ३ सप्टेंबरपर्यंत पाठवायची आहेत.
साहित्यविश्वासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. उर्जा पॅनलच्या अध्यक्षपदासाठी डॉ. उषा तांबे हे उमेदवार असून, डॉ. भालेराव विचार मंचाकडून किशोर रांगणेकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
साहित्य संघ मंदिररचे महत्त्व असे की, दर तीन वर्षांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय एका नव्या शहरात हलवले जाते. ज्या शहरात कार्यालय असते, तेथे तीन साहित्य संमेलने घेण्याची जबाबदारी त्या संस्थेवर येते.
गेल्या तीन वर्षांत हे संमेलने मुंबईतील साहित्य संघ मंदिररकडे होती. आता ही जबाबदारी मसाप (पुणे) कडे गेली असून ते सातारा (९९वे संमेलन), नंतर संभाजीनगर आणि शेवटी विदर्भातील नागपूर येथे संमेलने घेणार आहेत.
साहित्य संघ मंदिररची निवडणूक ही फक्त एका संस्थेपुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यविश्वाचे नेतृत्व कोणाकडे जाणार याचेही द्योतक असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.