कुसुंबी(अजित जगताप) : जगामध्ये शैक्षणिक प्रक्रियेचा मुख्य कणा आणि प्रेरणादायी घटक शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञान, संस्कार आणि सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकाची भूमिका सदैव केंद्रस्थानी आहे. असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी केले.
जावळी तालुक्यातील कुसुंबी मुरा प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अध्यापन, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, उपलब्ध सुविधा व राबविले जाणारे उपक्रम यांची पाहणी केली. ग्रामीण भागातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला . त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच शिक्षकांशी चर्चा करून अध्यापन पद्धती व उपक्रमांची माहिती घेतली.
या प्रसंगी गावातील पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेला दिलेल्या या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कुसुंबी मुरा प्राथमिक शाळेतील विविध उपक्रम, शिवजयंती उत्सव,कुस्ती आखाडा,शालेय पोषण आहार,रेन वॉटर हार्वेस्टिंग, जल शुद्धीकरण प्रकल्प, सौर विद्युत प्रकल्प, शैक्षणिक गुणवत्ता – इंग्रजी विषय विध्यार्थी चर्चा, आणि तालुक्यात राबवल्या जाणारे इ.५ वी, ८ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन तसेच सी.सी.टी.व्ही. युक्त शाळा बाबत समाधान व्यक्त केले . आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शनही केले.
सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षक हा केवळ वर्ग शिकवणारा नाही, तर शिक्षण क्षेत्राचा खरा कणा आहे. मुलांच्या भविष्यात नवी स्वप्नं रोवणारा, शाळांना नवा चेहरा देणारा आणि समाजाला दिशा दाखवणारा तोच खरा आधारस्तंभ आहे.
असे गौरवोद्गार काढले.
इयत्ता ७ वीतील विद्यार्थी कु. प्रतीक झोरे याने ‘शिवचरित्र’ या विषयावर माहितीपूर्ण भाषण सादर केले.
गोपाळकाला निमित्त बांधणेत आलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात श्रीमती नागराजन यांनी स्वतः विध्यार्थ्यां बरोबर सहभाग घेऊन गोविंदाचाही आनंद लुटला.
शाळा भेटीच्या या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळा कुसुंबीमुराचे सहशिक्षक श्री.रत्नाकर भिलारे यांनी कुसुंबी ग्रामस्थ्यांमार्फत स्वागत केले शाळेचे मुख्याध्यापक श्री.विनायक चोरट यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी जावळी तालुक्याचे गट विकास अधिकारी निलेश पाटील
गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ
शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, हंबीरराव जगताप, दळवी, मणेर, पवेकर मुळे, पडाळे, कांबळे, दुटाळ , तसेच
कुसुंबीमुरा गावचे सरपंच मारुती चिकणे, ग्रामस्थ ज्ञानेश्वर आखाडे, बाळा चिकणे, रामभाऊ चिकणे, संगीता झोरे, दिलीप दादू चिकणे तसेच शाळेतील सहशिक्षिका दीपाली चव्हाण शासकीय अधिकारी ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शिक्षक जालिंदर सुतार यांनी सर्वांचे आभार मानले.
_____________________________
फोटो — प्राथमिक शाळा कुसुंबी मुरा या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षक व अधिकारी (छाया– अजित जगताप कुसुंबी)