रांजणगाव : रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील फियाट इंडिया लि. कंपनी मधील वरिष्ठ अधिकारी व माथाडी कामगारांनी सुमारे हजार कोटी रुपयांचा महसूल शासनाला बुडवल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या गंभीर भ्रष्टाचार प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिला आहे.
शेवाळे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी कामगार मंत्री व प्रधानसचिव, कामगार यांना याबाबत निवेदन दिले होते. त्यावर शासनाने गंभीर दखल घेत पुणे जिल्हा माथाडी बोर्ड यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत संघटनेने बोगस खाते उघडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे व शासनाचा जवळपास 1000 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचे निष्पन्न झाले.