Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रसातारा जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात वृक्षारोपण

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात वृक्षारोपण

सातारा( अजित जगताप) : महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार सातारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागाच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय, सातारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

सातारा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात विविध जातीचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, प्रभारी बाह्य निवासी संपर्क अधिकारी डॉ. सुभाष कदम,प्रशासकीय अधिकारी डॉ. स्मिता लोंढे मॅडम व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. युवराज करपे यांनी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सांगितले की, झाडे लावा.. झाडे जगवा. निसर्गाचे चक्र जे बदललेले आहे. ते हे झाडे लावल्यामुळे पुन्हा निसर्गचक्र सुरळीत होईल.आणि नैसर्गिक समस्या उद्भवणार नाहीत. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक समस्या निर्माण होणार नाहीत. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयातील जन्म- मृत्यू- उपनिबंधक अधिकारी व्यंकटेश गौर, रुग्ण तपासणी कागद विभागाचे संजय नितनवरे, मुकादम कमल कांबळे, जीवन वाघमारे आणि वैद्यकीय अधिकारी,नर्सिंग अधिकारी, तंत्रज्ञ, रुग्णालय कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

—– —— —— —— —– —– —— —
फोटो – सातारा जिल्हा रुग्णालयात वृक्षारोपण करताना डॉ. करपे व मान्यवर (छाया- निनाद जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments