Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रहिंदुस्थान बँकेच्या संचालक मंडळाची पुन्हा बिनविरोध निवड;   कामगार नेते श्री. गुलाबराव...

हिंदुस्थान बँकेच्या संचालक मंडळाची पुन्हा बिनविरोध निवड;   कामगार नेते श्री. गुलाबराव जगताप तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान

प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रस्थान मिळवलेली दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि. — माथाडी कामगारांच्या घामातून घडलेली ही बँक — सन 2025-26 ते 2030-31 या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा बिनविरोध संचालक मंडळासोबत नवी वाटचाल सुरू करत आहे.

सभासदांनी सलग तिसऱ्यांदा बँकेचे अध्यक्ष व प्रगतीचे शिल्पकार श्री. गुलाबराव जगताप यांच्या नेतृत्वाला एकमताने कर्तुत्वाची मोहर दिली आहे. मा. अध्यासी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई शहर (१) यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पहिल्या संचालक मंडळ बैठकीत श्री. गुलाबराव जगताप अध्यक्षपदी व श्री. चंद्रकांत बोडके उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडले गेले.
श्री. गुलाबराव जगताप यांनी प्रथम १९९५ साली अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली तेव्हा बँकेकडे फक्त ५ शाखा, ₹२४.४२ कोटी ठेवी व ₹११.१४ कोटी कर्जाचा व्यवसाय होता. आज ३१ मार्च २०२५ अखेरीस बँकेच्या २६ शाखा, ₹९३६.०१ कोटी ठेवी, ₹४९८.९५ कोटी कर्जे, CRAR १६.८४%, निव्वळ NPA ०% असा भक्कम आर्थिक पाया आहे. यावर्षी बँकेने ₹१४.९५ कोटींचा विक्रमी नफा मिळवत एकूण व्यवसाय ₹१४३५ कोटींवर नेला आहे.
नव्या संचालक मंडळात ज्येष्ठ अनुभवसंपन्न नेत्यांसह ताज्या ऊर्जेने भारलेले तरुण संचालकही सामील झाले आहेत. माजी अध्यक्ष श्री. प्रकाश नार्वेकर, श्री. तुकाराम मोटे, सौ. संगीता दुधाळ यांना पुन्हा संधी मिळाली असून, श्री. मोहित जगताप, श्री. बापू गडदे, श्री. शरद गोडसे, श्री. श्रीमंत मोहिते, श्री. गणेश झांजे, श्री. विलास मागाडे, श्री. धनंजय जमदाडे व सौ. विमल मराठे प्रथमच संचालक पदावर विराजमान झाले आहेत.

निवडणुकीतील कटुता टाळून आणि मोठा खर्च वाचवून समाजात सलोखा राखण्याच्या हेतूने सलग तिसऱ्यांदा बिनविरोध संचालक मंडळाची निवड झाली. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, श्री. गुलाबराव जगताप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments