मुंबई(रमेश औताडे) : पारंपरिक शिक्षण पद्धत व भविष्याचा वेध घेत आवश्यक असलेले अभ्यासक्रम याची योग्य प्रकारे सांगड घालत जर अंगणवाडीतूनच त्या बालकाला घडवले तर भविष्यात त्याला त्या बाळकडूचा खूप लाभ होईल. हाच धागा पकडत समाजाचे देणं म्हणून गोदरेज ग्रुप ने राज्यभर भविष्यातील आधुनिक अंगणवाड्या निर्माण करण्याचे कार्य सुरू केले आहे. अशी माहिती गोदरेज एंटरप्रायझेसच्या सीएसआर प्रमुख अश्विनी देवदेशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खालापूर तालुक्यात तांबाटी गावात एकात्मिक बाल विकास सेवा व गोदरेज कंपनीच्या सामाजिक दायित्व फंडातून अंगणवाडीचे उद्घाटन नुकतेच देवदेशमुख यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सरपंच अविनाश आमले, पोलीस निरीक्षक सचिन पवार, राजेंद्र पाशीलकर, रमेश भांडारकर , तानाजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ जाधव, संतोष दळवी, अरुणा सावंत, सुगंधा जाधव, ग्रामसेवक प्रशांत कदम उपस्थित होते.