प्रतिनिधी : कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील भूमिहीन आंदोलनाचे सत्याग्रही, कुर्ला येथील समाजसेवक किसनराव लक्ष्मण झनके यांचे आज 28 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजतां दुःखद निधन झाले . वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ पत्रकार, समाजभूषण पुरस्कार सन्मानित बाळासाहेब उर्फ राजू किसन झनके आणि जगदीश किसन झनके यांचे ते वडील होत. कै. किसनराव झनके यांची अंत्ययात्रा उद्या 29 जुलै रोजी दुपारी 12 वा. मिलन नगर , स्वामी विवेकानंद शाळेजवळ, शिवसृष्टी रोड, कुर्ला (पूर्व) येथून निघणार आहे.
भूमिहीन आंदोलनाचे सत्याग्रही किसनराव झनके यांचे निधन
RELATED ARTICLES