मुंबई (शांताराम गुडेकर) : कोकण कट्टा सेवाभावी संस्था व स्वामी समर्थ मठा तर्फे स्थानिक आदिवासी विभागातील रायगड जिल्हा परिषद शाळा व तेथील आश्रम शाळेतील सुमारे ८५ विद्यार्थीना प्रत्येकी ६ वह्या, पेन, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर व खाऊ यांचे भेट देण्यात आली.दुर्गम आदिवासी विभागातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व आपण ही समाजाचे देणे लागतो हे लक्षात घेऊन हा उपक्रम गेली अनेक वर्ष सातत्याने विविध विभागात सुरु ठेवले आहे असे मनोगत कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अजितदादा पितळे यांनी व्यक्त केले.तर तारा विभागातील समाजसेविका पुष्पलता पाटीलताई यांनी विभागातील अनेक मुले अशा साहित्या पासून वंचित आहेत आपला उपक्रम स्तुत्य आहे.आम्हाला केलेल्या मदतीसाठी आभार व प्रतिवर्षी अशीच मदत करावी असे नम्र आवाहन केले.स्वामी मठातर्फे उपस्थित शालेय मुलांना प्रसाद म्हणून गोड जेवण देण्यात आले. प्राध्यापिका पुष्पा शर्के, शिक्षक निलेश कोळी मठाचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, कोकण कट्टा संस्थांपक अजित पितळे, मार्गदर्शक जगन्नाथ गावडे, राजमुद्रा मासिकाचे संपादक पत्रकार अरविंदजी गुरव, सुजित कदम, विवेक वैद्य,राजन राऊत मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापिका पुष्पा शिर्के यांनी व शाळेतील विद्यार्थीयांनी मोजक्याच शब्दात आभार प्रदर्शन केले. मुलांच्या टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोकण कट्टा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्यान केंद्र (आपटे फाटा स्वामी मठ )आयोजित श्रावण मास शुभारंभनिमित्त शैक्षणिक सोहळा संपन्न
RELATED ARTICLES