मुंबई : विलेपार्ले (पूर्व) येथील श्री रामानुज को-ऑप हौसिंग सोसायटीच्या अध्यक्ष अशोक गुप्ता यांनी एक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, त्यांच्या इमारतीच्या शेजारील प्लॉट क्रमांक एफ.पी. १८५, टी.पी.एस. क्र. २ वर सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर असून देखील मुंबई महापालिकेच्या नगर विकास अभियंत्यांनी आणि बांधकाम प्रस्ताव विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
या प्रकरणी गुप्ता यांनी महापालिका, पोलीस स्टेशन तसेच नगरविकास विभागाकडे तक्रारी केल्या असून देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यांनी असा आरोप केला की, “महापालिकेला बेकायदेशीर बांधकामाची संपूर्ण कल्पना असूनही बांधकाम थांबवले जात नाही. हे सगळे बिल्डर आणि अधिकाऱ्यांमधील संगनमतामुळे घडत आहे.”
गुप्ता यांनी या मुद्यावर पत्रकार परिषद घेत म्हणाले की, “२००६ साली नगरविकास विभागाकडून बांधकामाची परवानगी देण्यात आली होती. मात्र आमच्या सोसायटी आणि नव्या इमारतीदरम्यान आवश्यक ‘पार्टी यार्ड’ न ठेवता बांधकाम केले जात आहे. दोन गाड्याही योग्यरित्या फिरू शकत नाहीत, त्यामुळे आमच्या इमारतीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.”
तसेच, या प्रकरणावर सध्या न्यायालयात खटला सुरू असून, न्यायालयाने गुप्ता यांच्या बाजूने अंतरिम आदेश दिला आहे. तरीदेखील प्रत्यक्षात महापालिकेची कारवाई झालेली नाही.
गुप्ता यांनी शेवटी म्हटले, “महापालिकेला सर्वोच्च नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार न करता बिल्डरच्या बाजूने निर्णय घेत आहेत. आमच्या सोसायटीतील वृद्ध, महिला आणि लहान मुलांच्या आरोग्याला याचा धोका आहे. आता आम्हाला असा प्रश्न पडतोय की महापालिका आमचा अंत पाहत आहे का?.याबाबत महापालिका अंधेरी पूर्व येथील सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क केला असता रिप्लाय मिळाला नाही.