Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रविलासराव कोळेकर यांचा मुस्लिम एज्युकेशन सोसाटीच्या वतीने सत्कार संपन्न

विलासराव कोळेकर यांचा मुस्लिम एज्युकेशन सोसाटीच्या वतीने सत्कार संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर) : दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ.ऐ. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सैतवडे ( गुम्बद ) सरपंच सौ. उषा सावंत, सैतवडेचे (बोरसई ) साजीद शेकासन, जांभारीचे सरपंच आदेश पावरी, इरा इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक इमरान अंतुले, व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रहीम माद्रे यांनी बुके, शाल, भेटवस्तू तसेच सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी इमरान अंतुले, आदेश पावरी, सौ.उषा सावंत, रहीम माहे, राजेंद्र कदम व काही विद्यार्थ्यानीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्री कोळेकर सर यांनी मॉडेल स्कुल नावाप्रमांणेच मॉडेल शाळा केली आहे, सतत नव नवे उपक्रम,शाळेची वाढलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सर्वच ठिकाणी सुरु असलेली गरुडभरारी ही कौतुकास्पद आहे असे सर्वच मान्यवरांनी स्पष्ट केले.सत्काराला उत्तर देताना श्री कोळेकर म्हणाले हे यश माझे नसुन उत्तम सहकार्य करणा-या संस्थेचे, सर्वोत्तम अध्यापन करणा-या सर्व शिक्षकांचे, प्रयत्नवादी विद्यार्थ्यांचे, आणि प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभाग घेणा-या पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आहे असे नमूद केले.
तसेच पालकांप्रमाणेच परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे व नागरिकांचाही नेहमीच सहकार्याचा हात असतो, त्यामुळेच आज शाळेची चौफेर प्रगती झाली.
या समारंभास मकबुल पारेख, संस्थेचे सदस्य हशमत निवेकर, रज्जाक फकीर तसेच राजू सावंत आदी ही उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुमान पारेख यांनी केले. सुत्रसंचालन विनोद पेढे यांनी केले,तर आभार अविनाश केदारी यांनी मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments