Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रकाटोल, नरखेड आणि मोवाड शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश!

काटोल, नरखेड आणि मोवाड शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश!

प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड व मोवाड नगर परिषदांच्या पाणीपुरवठा प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली.

काटोल, नरखेड आणि मोवाड या शहरांतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या तिन्ही शहरांतील नागरिकांना दररोज नियमित मिळावे यासाठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करावी. यासाठी नगरोत्थान योजनेतून उपलब्ध असलेल्या निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करण्यात यावा. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाहीत, याचीही जबाबदारी स्थानिक प्रशासनाने घ्यावी. जलसंपदा विभाग, नगर परिषद आणि कार्यकारी यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

या बैठकीला मंत्री गिरीष महाजन, आ. आशिष देशमुख, आ. चरणसिंग ठाकूर व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments