ताज्या बातम्या

घोगाव (संभाजीनगर) – रानटी डुकरांचा उच्छाद, शेतकऱ्याच्या ऊस पीकाचे मोठे नुकसान

प्रतिनिधी : घोगाव येथील कुंभारकी शिवारातील शेतकरी श्री. तानाजी राजाराम शेवाळे यांच्या २० गुंठे क्षेत्रावरील ऊस पीकावर रानटी डुकरांनी धुमाकूळ घालत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

या घटनेची त्वरित दखल घेत वनविभागाने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, तसेच नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पीडित शेतकऱ्यास योग्य नुकसानभरपाई द्यावी, ही विनंती स्थानिक ग्रामस्थांकडूनही करण्यात येत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top